अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात न देण्याचे उच्च न्यायालयाचे प्रशासनाला निर्देश

Share This News

मुंबई, २७ एप्रिल : स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नये, असे महत्वपूर्ण निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत.
कोरोना काळातील समस्यांबाबत दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने उपरोक्त निर्देश दिले आहेत.
न्यायालयाने म्हटले आहे की, सध्या मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या तुलनेत उपलब्ध व्यवस्था पुरेशी नाही. राज्यभरातील अंत्यसंस्काराच्या ठिकाणांची स्थिती सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर राज्यभरातील शवागृहांची स्थितीही सुधारण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.