अधिक मासात सत्पात्री दानाचे महत्व

Share This News

आपल्या मिळकतीचा काही भाग जेव्हा आपण पुण्य मिळवण्याच्या उद्देशाने देतो, सर्वसाधारणपणे त्याला दान असे म्हणता येईल. पण, हे दान कुणाला द्यावे? त्याचा उपयोग योग्य कार्यासाठी होतोय का हे कसे ठरवायचे? त्यातही सत्पात्री दान कशाला म्हणायचे?  असे प्रश्न आपल्या समोर येतात.

तर, अशी व्यक्ती किंवा संस्था जी राष्ट्ररक्षण आणी धर्मजागृती यासाठी कटीबद्ध आहे, जिथे सतत समाजाला दिशा देण्याचे कार्य होत असते, धर्मशिक्षण दिल्या जात असते, आध्यात्मिक ज्ञान दिल्या जात असते, अशा व्यक्ती किंवा संस्थेला दिलेले दान हे “सत्पात्री दान” असते!

हे दान आपण वस्तूंच्या रुपात, धनाच्या रुपात देऊ शकतो.

अन्नदान हे सुध्दा एक सर्वश्रेष्ठ दान आहे!

     सध्याच्या काळात पाश्चात्य लोकांचे अनुकरण करत आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. धर्माला ग्लानी आलेली असल्याने ‘धर्मशिक्षण देणे आणी धर्मप्रसार करणे’, हे काळानुसार आवश्यक कार्य झालेले आहे. धर्मप्रसाराचे कार्य करणारे संत, संस्था वा संघटना यांना अन्नदान करणे, हे सर्वश्रेष्ठ दान आहे! या सद्भावनेने सत्पात्रे अन्नदान केल्यास अन्नदात्याला

त्याचे उचित फळ मिळते. तसेच, सर्व पातकांतून त्याचा उध्दार होऊन तो ईश्वराच्या जवळ जातो असे धर्मशास्त्र सांगते. अन्नदान करणार्याला याचा आध्यात्मिक स्तरावरही लाभ होतो .

     अधिक मासात दान केल्यास अधिक पटींनी फळ मिळत असल्याने अनेक जण अन्नदान, वस्त्रदान आणि ज्ञानदान करतात. कारण, सत्पात्री दान पापनाशक असून पुण्यबळाची प्राप्ती करून देणारे असते. त्यामुळेच, या अधिक मासात आपण जेवढे सत्पात्री दान करू, तेवढे पुण्य आपल्या पदरात पडणार हे निश्चित असते!

नंदिनी वाकडे


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.