विदर्भात थंडीची तीव्रता घटली; नव्या वर्षात थंडीचे पुनरागमन होण्याची शक्यता
नागपूर:-
गेल्याच आठवड्यात संपूर्ण विदर्भ कड्याक्याच्या थंडीमुळे गारठला होता,मात्र पुढील चार दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. तो अंदाज आता तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. गेल्या चार दिवसांपासून मध्य भारतातील विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्रता घटल्याचे दिसून येत आहे. आज विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांचे तापमान १० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवण्यात आले आहे. साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उपराजधानी नागपूरसह संपूर्ण विदर्भच गारठलेला असतो,मात्र यावर्षी थंडी कमी जास्त होत असल्याने गेल्या वर्षीच्या थंडीचा रेकॉर्ड मोडीत निघण्याची शक्यता फार कमी झाली आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी नागपूरात ३.५ अंश सेल्सिअस इतक्या नीचांक तापमानाची नोंद झाली होती हे विशेष.
आज नागपुरातील तापमान १४.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. तर अकोला येथे १२.६, अमरावती १४.८,बुलढाणा १२.४, चंद्रपूर- १४.६, गडचिरोली १४.०, गोंदिया १२.८, वर्धा १४.५, वाशीम १२.६ आणि यवतमाळ येथे १३.५ इतके तापमान नोंदवण्यात आले आहे.
थंडीचा प्रभाव काही प्रमाणात कमी होईल ज्यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळालेला आहे
गेल्या काही वर्षांपासून डिसेंम्बर महिन्याच्या शेवटी तापमानात प्रचंड घट नोंदवण्यात येत आहे. २०१८ साली २९ डिसेंम्बरच्या रात्री तापमान ३.५ पर्यंत खाली आले होते तर गेल्या वर्षी देखील त
थंडीचा पारा ५.१ पर्यंत खाली आल्याची नोंद हवनामान विभागाकडे आहे