भयावह…विरारच्या रुग्णालय आगीत १३ कोरोनाबाधित होरपळले

Share This News

मुंबई, २३ एप्रिल : नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. अशातच विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली. यामध्ये १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि अन्य रुग्णांची सुटका केली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात मध्यरात्री ३ वाजल्याच्या सुमारास ही आग लागली. एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग इतकी भीषण होती की, यात अतिदक्षता विभागातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. सध्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले असून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्याचे काम सुरू आहे.
चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. 
मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश
मृतांची नावं –
उमा सुरेश कनगुटकर निलेश भोईरपुखराज वल्लभदास वैष्णवरजनी आर कडूनरेंद्र शंकर शिंदेजनार्दन मोरेश्वर म्हात्रेकुमार किशोर दोशीरमेश टी उपयानप्रविण शिवलाल गोडाअमेय राजेश राऊतरामा अण्णा म्हात्रेसुवर्णा एस पितळेसुप्रिया देशमुखे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.