उच्च व तंत्र शिक्षण मंत्री जाणून घेणार पालक व शाळांच्या अडचणी
वर्धा दि 3 (जिमाका):- उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने “उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ नागपूर” हा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमातर्गत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत मंत्रालय व संचालक स्तरावील अधिका यांसमवेत वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथून “उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ नागपूर” या पोर्टल वरुन विद्यार्थी , पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापिठीय कर्मचारी , शैक्षणिक संस्थाच्या अडी – अडचणी जाणून घेऊन अडचणीचे निराकरण करणार आहे. यासाठी विद्यार्थी , पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापिठीय कर्मचारी , शैक्षणिक संस्थानी 5 फेब्रुवारी ला सकाळी 11 वाजता www.nagpuruniversity.ac.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर “उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ नागपूर” या पोर्टल वरुन प्रश्न मांडावे असे आवाहन जिल्हा ग्रंथपाल नि.त्र्य सोनोने यांनी केले आहे.
नागरिकांना इंग्रजी अथवा युनिकोड मराठीतुन आपले प्रश्न मांडता येणार आहे. निवेदनाची सॉप्ट कॉपी जोडविण्याची व्यवस्थाही येथे आहे. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकांनी आपली निवेदने ऑनलाईन सादर करने शक्य होणार नाही त्यांनाही सदर कार्यक्रमास उपस्थित राहून निवेदने सादर करता येणार आहे. असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.