दारूसाठी पैसे न दिल्याने आईचे डोके फोडले

Share This News

नागपूर :
दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाने आईचे डोके फोडले. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वानाडोंगरी परिसरात ही घटना घडली. यात
लक्ष्मी नारायण लांडगे (वय ६५) या जखमी झाल्या.


लक्ष्मी त्यांच्या दोन मुले आणि मुलीसोबत वानाडोंगरी परिसरात राहतात. त्यांच्या मुलांपैकी राजू बेरोजगार आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. दारूच्या पैशांसाठी तो अनेकदा कुटुंबीयांशी भांडतो. त्यांना मारहाणही करतो. काही दिवसांपूर्वीच त्याचे बहिणीशी भांडण झाले होते. त्याने तिलाही मारहाण केली होती. याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्याला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच तो कारागृहातून सुटून आला. लक्ष्मी घरगुती कामे करतात. राजुने त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. त्यांनी नकार दिल्याने राजूने त्यांच्याशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात राजूने लक्ष्मी यांच्या डोक्यात फरशी मारली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. पोलिसांनी राजूविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.