नागपुरात जुगार अड्ड्यावर नोकरीला ठेवलेल्या तरुणांनीच केली हत्या

Share This News

नागपूर : रविवारी रात्री पाचपावली भागात जुगार धंद्याच्या वादातून इंद्रजित बेलपरधी या गुंडाची हत्या करण्यात आली. मृतकासोबत जुगाराच्या धंद्यात शहरी असलेल्या दोन अल्पवयीन आरोपीने त्यांची हत्या केली. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याची पोलिसांनी माहिती दिली.

आरोपी हे देखील गुंड प्रवृत्तीचे असून याआधी देखील त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. महत्वाचे म्हणजे मृतकाने अनेक प्रकरणात आरोपींची जामीनावर सुटका केली होती व स्वतःच्या जुगार अड्ड्यावर नोकरीला देखील ठेवले. इंदरजित हा कुख्यात बाल्या बिनेकरच्या काळापासून नाईकनगर तलाव भागात जुगार अड्डा चालवत होता. नंतरच्या काळात बाल्या बिनेकरची हत्या झाल्यानंतर इंदरजितने आपला अवैध धंदा वाढवला होता. या धंद्यात त्याची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपीची हत्या त्याला मदत करत होते.
रविवारी दुपारी आरोपी व इंदरजित यांची जुगार अड्ड्याच्या पैशाच्या हिशोबावरून वाद झाला. इंदरजितने दोन्ही आरोपीला मारहाण केली. ” भाऊ आम्हाला मारून तुम्ही योग्य नाही केले” असे म्हणत आरोपी निघून गेले. हाच राग मनात ठेवून दोन्ही आरोपीने इंदरजितचा काटा काढायचे ठरवले. रविवारी रात्री इंदरजित हा आपल्या मित्रासोबत दारू प्यायला बसला होता. दारू प्यायल्यानंतर त्याचा मित्र घरी गेला. हीच संधी साधत आरोपीने धारधार शस्त्राने वार करत इंदरजितची हत्या केली केली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.