कोरोना लस घेतल्यानंतर दोन दिवसांत नर्सचा मृत्यू

Share This News

लिस्बन
फायजरच्या लस वापरासह अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, पोतरुगालमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लस घेतल्याच्या दोन दिवसानंतर एका नर्सचा मृत्यू झाला. सोनिया असेवेदो (४१ वर्ष) ही नर्स एका कर्करोग रुग्णालयात कार्यरत होती. तिच्या मृत्यूवर तिच्या कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
फायजरची लस घेतल्यानंतर या नर्सला कोणताही त्रास जाणवला नाही. नर्स सोनिया असेवेदो यांच्या वडिलांनी स्थानिक माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, माझ्या मुलीची प्रकृती व्यवस्थित होती. मुलीने कोरोनाची लसही घेतली. मात्र, तिला कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. माझ्या मुलीचा मृत्यू कसा झाला, याचे मला उत्तर हवे असल्याचे त्यांनी सांगितले. सोनिया कार्यरत असलेल्या रुग्णालयाने तिने ३0 डिसेंबर रोजी फायजरची लस घेतली असल्याचे म्हटले. रुग्णालयाने म्हटले की, सोनियाने लस घेतल्यानंतर तात्काळ आणि काही तासांनंतरही तिला कोणताच त्रास जाणवला नाही. सोनियाच्या मृत्यूचा तपास सुरू असल्याचे रुग्णालयाने सांगितले. या रुग्णालयात सोनिया मागील १0 वर्षांपासून काम करत आहे. सोनिया आपल्या कुटुंबीयांसह राहत आहे. मात्र, तिचा मृत्यू जोडीदाराच्या घरी झाला. लस घेतल्यानंतर सोनियाने फेसमास्कसह सेल्फीही घेतला होता. नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोनियाच्या निधनाची बातमी समजली असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. सोनियाच्या मुलीने सांगितले की, लस टोचल्यानंतर तिला कोणताही त्रास झाला नाही. सोनियाशिवाय रुग्णालयाच्या ५३८ अन्य कर्मचार्‍यांनाही फायजरची लस देण्यात आली होती. या घटनेची माहिती पोतरुगालच्या आरोग्य मंत्रालयाला देण्यात आली आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोएनटेकने विकसित केलेल्या लसीला मंजुरी दिली आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून पहिल्यांदाच एखाद्या लसीला मान्यता देण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या या मंजुरीनंतर आता लसीच्या वापरासाठी जागतिक पातळीवर मार्ग खुला झाला आहे. याआधीच काही देशांनी फायजर-बायोएनटेकच्या लसीला मंजुरी दिली आहे. फायजरच्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिल्यामुळे ही लस गरीब देशांनाही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ही लस अमेरिका आणि युरोपमध्येच उपलब्ध आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.