बजेटच्या दिवशी सोने स्वस्तात खरेदी करण्याची संधी; 10 ग्रॅम सोने खरेदी केल्यास इतक्या रुपयांची सूट

Share This News

नवी दिल्ली: कोरोना संकट आणि त्यानंतर अर्थव्यवस्थेत आलेल्या चढउतारांमुळे सध्या सोने हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जात आहे. साहजिकच यामुळे सोन्याची मागणी वाढली असून त्याचे दरही गगनाला भिडले आहेत. मात्र, येत्या 1 फेब्रुवारीला म्हणजे बजेटच्या दिवशी तुम्हाला सोने स्वस्तात खरेदी करण्याची नामी संधी चालून आली आहे. (Sovereign Gold Bond buy on budget day)

1 फेब्रुवारीला सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीमच्या (Sovereign Gold Bond Scheme) 11 व्या सिरीजचे सबस्क्रिप्शन ओपन होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या स्कीमची इश्यू प्राईस 4,912 रुपए प्रति ग्रॅम इतकी निश्चित केली आहे. तुम्ही या स्कीममध्ये 1 ते 5 फेब्रुवारी या काळात गुंतवणूक करु शकता.

सॉवरेन गोल्ड बाँड हा डिजिटल सोन्याचा उत्तम मार्ग आहे. परंतु गुंतवणुकीपूर्वी हे लक्षात ठेवा की सोन्याच्या बाजारात घसरण झाल्यास भांडवलाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक तोळ्यामागे 500 रुपयांची सूट?

तुम्ही Sovereign Gold Bond Scheme मध्ये ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक करुन डिजिटल पेमेंट केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक 1 ग्रॅम गुंतवणुकीसाठी 50 रुपयांची सूट मिळेल. याचाच अर्थ तुम्ही एक तोळा सोने खरेदी केल्यास तुम्हाला एकूण 500 रुपयांची सूट मिळेल.

सॉवरेन गोल्ड बॉन्डची वैशिष्ट्ये

* सॉवरेन गोल् बाँड रिझर्व्ह बँकेकडून जारी केले जातात.
* या योजनेत गुंतवणूक 1 ग्रॅमपासून पुढे गुंतवणूक करू शकतात.
* या योजनेचा गुंतवणूक कालावधी 8 वर्षांचा आहे. मात्र, पाचव्या वर्षी तुम्ही गुंतवणूक विथड्रॉ करु शकता. मात्र, त्यासाठी काही अटी आहेत.
* भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय, हिंदू अविभाजित कुटुंब, धर्मादाय संस्था आणि विद्यापीठांनाच या योजनेत गुंतवणूक करता येते.

गुंतवणुकीची मर्यादा

या बाँडमध्ये गुंतवणूकदार वर्षाला जास्तीत जास्त 4 किलो सोन्यात गुंतवणूक करू शकतात. त्याची किमान मर्यादा एक ग्रॅम सोन्याची आहे.

बजेटनंतर सोन्याचे दर पडणार?

देशाचं बजेट आता काही तासांवर येऊन ठेपलंय आणि सोन्याच्या भावाचं (Gold rates) काय होणार असा सर्वात मोठा प्रश्न ग्राहक आणि सोन्याचे व्यापारी असा दोघांनाही पडलाय. तर त्याचं उत्तर आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या मतानुसार बजेटनंतर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होऊ शकते. सध्या सोन्यावर इम्पोर्ट ड्युटी खूप जास्त असल्यामुळे आणि त्यात पुन्हा जीएसटी लागत असल्यानं सोन्याचे वाढलेत.

सध्या इम्पोर्ट ड्युटी 12.5 टक्के एवढी तर जीएसटी 3 टक्के एवढी आहे. खूप काळापासून सोन्याची इम्पोर्ट ड्युटी कमी करावी तसच जीएसटीतही सुधार करावी अशी मागणी व्यापारी करतायत. ती कदाचित ह्या बजेटमध्ये पूर्ण केली जाईल असं जाणकारांना वाटतं. इम्पोर्ट ड्युटी कमी केली तर सोन्याच्या दरात मोठी घसरण निश्चित मानली जातेय.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.