पेट प्रवेश परीक्षेच्या सरावासाठी (Mock Test) पुन्हा संधी २१ मार्च पर्यंत देता येणार सराव परीक्षा The opportunity to re-practice the mock test can be given till March 21

Share This News

मुंबई, दि. १८ मार्च: मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षेच्या नियोजनाचा भाग म्हणून विद्यापीठाने दिनांक १२ ते १७ मार्च दरम्यान सराव परीक्षेचे आयोजन केले होते. या दरम्यान काही विद्यार्थ्यानी यशस्वीरीत्या सराव परीक्षा दिली आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप सराव परीक्षा दिली नाही अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी देण्यात येत असून ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सराव परीक्षा दिली नाही त्यांनी दिनांक २१ मार्च २०२१ पर्यंत सराव परीक्षा देण्याचे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यानी केले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली आहे अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा सराव परीक्षा देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई विद्यापीठाने पेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून यानुसार २५ मार्च रोजी एमफील तर २६ आणि २७ मार्च २०२१ रोजी पीएचडी प्रवेश परीक्षा होणार आहे. एकूण ७९ विषयांसाठी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असून याबाबतचे सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.