अहमदाबादमधील जागातील सर्वात मोठ्या स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव, राष्ट्रपतींनी केलं उदघाटन | The President inaugurated the largest stadium in the world named after Narendra Modi in Ahmedabad

Share This News

अहमदाबाद – गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियम उभारण्यात आले आहे. या स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना आजपासून खेळवण्यात येणार आहे. (India vs England 3rd Test Live Score ) दरम्यान,

यापूर्वी मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे. (President Ram Nath Kovind inaugurates Narendra Modi Stadium at Motera in Ahmedabad) जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा लौकिक मिळवणाऱ्या या स्टेडियमचे औपचारिक उदघाटन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.