मुंबईतील फेरिवाल्यांसाठी पंतप्रधानांंची स्वनिधी योजना पुन्हा राबविणार The Prime Minister’s Swanidhi Yojana will be implemented again for street vendors in Mumbai

Share This News

भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांची मागणी मान्य
मुंबई, १० मार्च: फेरिवाल्यांना दहा हजार रुपयांची कर्ज मदतीची पंतप्रधान स्वनिधी योजना मुंबईत पुन्हा राबविण्यात येईल अशी असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
विधानसभेत मंगळवारी फेरिवाल्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबईतील फेरिवाल्यांचा विषय मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरिवाल्यांना स्वनिधी योजना सुरु केली होती. मात्र मुंबई पालिका आयुक्त़ांनी त्याला.सध्या स्थगिती दिली आहे. कोरोना काळात फेरिवाल्यांना असंख्य अडचणींंचा सामना करावा लागला त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदतीची गरज आहे. त्यामुळे ही योजना सुरु करा. अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना पुन्हा सुरु करण्यात येईल असे सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.