भंडारा : वाळू माफियांची मुजोरी वाढली आयएएस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की, वरठी पोलिसात गुन्हा दाखल | The sand mafia’s arrogance increased, IAS officers were pushed and a case was registered with the Varathi police
भंडारा : जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी थांबता थांबेना आईएएस महिला अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली आहे, वाळूने भरलेला ट्रक्टर अडविला .त्या वाहनाची चाबी सहायक जिल्हाधिकारी तथा मोहाडी येथे प्रोफेशनल तहसीलदार म्हणून कार्यरत मिनल करनवाल यांनी काढली. म्हणून वाळू माफियांनी धक्का बुक्की केली असून वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, भंडारा जिल्ह्यातुन वैनगंगा नदी वाहत असून येथील वाळूला विदर्भात मोठी मागणी आहे, मागील दोन वर्षांपासून वाळूघात लिलावात गेले नसले तरी वाळूची चोरटी वाहतूक सुरूच आहे,तर या वाळूमाफियांना जर अधिकाऱ्यांनी थांबवलं तर अधिकाऱ्यांवर हात उगारायला हे वाळूमाफिया मागे पुढे पाहत नाही त्यामुळे या वाळू माफियांना कुणाचा अभय आहे असा सवालही उपस्थित केला जात आहे, तर काल मोहाडी तहसीलदार म्हणून प्रोफेशनल आयएएस अधीकारी मिनल करणवाल याना वाळुनी भरलेला ट्रॅक्टर व ट्रक यांना रोहा बेटाला मार्गावर जात असताना दिसल्यावर त्यांनी ट्रॅक्टरला थांबवून त्याची किल्ली काढून घेतली त्यानंतर तर काही वेळातच वाळू माफियांचा झुंड त्या ठिकाणी येऊन तहसीलदार व त्यांच्या चालकाला धक्काबुक्की केली त्यांनतर तहसीलदार यांनी याची माहिती फोन द्वारे पोलिसांनी दिली असून पोलीस येताच माफियांना घटनास्तळावरून पळ काढला होता, मात्र या संपूर्ण प्रकरणाची तक्रार वरठी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे, पोलिसांनी ट्रॅक्टरसह चालकाला अटक केला असून त्यांच्या विरुद्ध भादंवि कलम ३५३, ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, ट्रक व इतर आरोपींचं शोध पोलीस घेत आहे.
The sand mafia’s arrogance increased, IAS officers were pushed and a case was registered with the Varathi police