चुलत बहिणीवरच केला बलात्कार The shocking incident of a brother raping his cousin took place in Ringnabodi village within the limits of Kondhali police station.

Share This News

नागपूर : भावानेच चुलत बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिंगनाबोडी गावात घडली.


याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. बुधवार, ३ मार्चला ही घटना घडली. पीडित मुलगी दहा वर्षांची आहे. ती आरोपीची सख्खी चुलत बहिण असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी खासगी कंपनीत नोकरीला आहे. पीडित मुलगी पाचवीत शिकते. दोन्ही कुटुंब शेजारीच राहतात. आरोपीने घटनेच्या दिवशी पीडितेला ब्लेड आणायला सांगितले. त्यानुसार ती ब्लेड घेऊन आल्यानंतर आरोपीने बालिकेवर बलात्कार केला. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.