राज्यात परिस्थिती अत्यंत गंभीर, तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनची तयारी

Share This News

नागपूर ः उपराजधानी नागपूरसह राज्यात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना राज्य सरकार दीर्घकालीन कठोर लॉकडाऊनची तयारी करते आहे. आज सर्वपक्षीय बैठकीनंतर कठोर लॉकडाऊनचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.


राज्यात रोज किमान साठ हजार कोरोनाचे नवे रुग्ण पुढे येत आहेत. नागपुरात नव्या रुग्णांचा रोजचा आकडा आता सहा हजाराला टेकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागपुरातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णांनाही आता हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळेनासे झाले आहे. हजारोंच्या संख्येने हॉस्पिटल्सना विचारणा करणारे कॉल्स येत आहेत. रुग्णांसाठी उपयुक्त ठरत असलेल्या रेमडेसीव्हीर इंजेक्शन्सचा तुटवडा कायम आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये हीच परिस्थिती आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी कठोर लॉकडाऊन हा एकमेव उपाय असल्याच्या निष्कर्षाप्रत सहकार पोहोचले आहे. भाजपही कठोर लॉकडाऊनला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत किमान तीन आठवड्यांचे कठोर लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असे संकेत सरकारच्या सूत्रांकडून मिळत आहेत. शुक्रवारी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तीन आठवड्यांच्या कठोर लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.
राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे. या आपात्कालीन परिस्थित वैद्यकीयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचीही मदत घेतली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.