हिंगणा एमआयडीतील परिसरातील स्पेसवूड कंपनीला भीषण आग
२९ डिसेंबर – हिंगणा एमआयडीतील परिसरातील स्पेसवूड कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही
हिंगणा एमआयडीसी परिसरातील स्पेसवूड या प्लायवूड फर्निचर तयार करणार्या कारखान्याला मंगळवारी (२९ डिसेंबर) दुपारी ४.३0च्या सुमारास भीषण आग लागली.
एमआयडीसी परिसरात प्लॉट क्र. टी. ४६ / ४७ / ४८ सुमारे अर्धा एकराच्यावर जागेत स्पेसवूड हा प्लायवूडपासून फर्निचर तयार करण्याचा कारखाना आहे. मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक ऑफिसजवळ असलेल्या शेडमध्ये आग लागली. सर्वत्र लाकडी भुसा व प्लायवूड असल्याने काही वेळातच ही आग संपूर्ण कारखानाभर पसरली. कारखान्यात जवळपास शे-दीडशे कामगार व अधिकारी होते. आग लागल्याचे लक्षात येताच इर्मजन्सी सायरन वाजवून कामगारांना बाहेर जाण्याची सूचना देण्यात आली. लगेच एमआयडीसी अग्निशमन दल व पोलिसांना सूचना देण्यात आली. 12 फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि टँकर घटनास्थळी पोहोचल्या असून, अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचा प्रयत्न काही वेळातच आगीचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतु, ही आग वाढतच होती. नागपूर महानगरपालिका व वाडी नगरपरिषद येथूनही अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे व कर्मचार्यांनी आजूबाजूला असलेल्या नागरिकांना दूर हाकलून शेजारच्या कारखान्यातूनसुद्धा कामगारांना बाहेर जाण्याची सूचना दिली. पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी व आमदार समीर मेघेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते.
बुधवारी पहाटे साडे पाच च्या सुमारास आगीवर अग्निशमन दलाने नियत्रण मिळविले, परंतु तो पर्यंत या अग्नि तांडवात कंपनी मधील कारखाना,पॅकिजिग यूनिट व गोडाऊन मधील सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीत कंपनीचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाल्याचे वर्तवण्यात येत आहे .