ओबीसींचा चंद्रपूरातील मोर्चात राज्य सरकारने परवानगी नाकारली
परवानगी नसतानाही पालक मंत्री काढणार मोर्चा
चंद्रपूर ओबीसींच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरात सर्व दूर मोर्चाचे आयोजन होत आहे. चंद्रपुरात ओबीसींचे राजकारण करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री विजय वडेट्टीवार स्वतः मैदानात उतरले आहे. मात्र त्यांनी आयोजित केलेल्या गुरुवारच्या मोर्चाला परवानगी न देऊन एकीकडे राज्य सरकारने ओबीसींना विरोध करण्याची भूमिका स्वीकारली असून स्वतः राजकारणामध्ये मंत्री असलेले विजय वडेट्टीवार परवानगीचा मुद्दा झुगारून मोर्चा काढण्याची घोषणा करून बसले आहेत.
ओबीसींचा वेगवेगळ्या समस्या आणि मागण्यांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी चंद्रपूर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. खुद्द पालक मंत्री या मोर्चाचे आयोजन करणार आहे. येथील मोर्चा ही त्यांच्या नेतृत्वात निघणार आहे. मात्र या मोर्चाला परवानगी नाकारून राज्य सरकारने ओबीसींच्या मागण्या व समस्या बाबत आपले धोरण स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे पालकमंत्र्यांनी कायदा पायदळी तूडवण्याची ची भूमिका जाहीर केली आहे.
या मोर्चात राजकीय पक्षाची बंधने झुगारून ओबीसींच्या समूहातील लोक ,तरुण सहभागी होणार आहेत. त्यामुळेच त्यांच्या संदर्भात कायदा मोडण्याची कोणतीही कारवाई होऊ नये म्हणून स्वतः पालकमंत्र्यांनी पूर्ण ताकद लावून या मोर्चासाठी परवानगी आणणे अपेक्षित होते.कारण परवानगी नसताना काढलेल्या मोर्चातून पालकमंत्र्यांचे राजकारण साधले जाणार असले तरी मोर्चात सहभागी होणारे लोक मात्र भरडले जाणार आहे.