टँकर उलटला, चालकाचा जागीच मृत्यू

Share This News

सावनेर-हेटी-काटोल बायपासवर बुधवारी (१७ फेब्रुवारी) सकाळी ४.१५ वाजतादरम्यान एक गैस टँकर उलटला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की, टँकर क्र. एम. एच. ४0 / बी. एल. ४४२७ हा टँकरचालक फिरोज वल्द अजहुल हक (वय २२), रा. मजगाव, उत्तर प्रदेश घेऊन बैतूलकडून नागपूर एमआयडीसीकडे चालला होता. बायपास मोडवर टँकर पलटवताना अचानक टँकर अनियंत्रित होऊन पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. चालकाने गाडीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केले. मात्र, त्याच दिशेने टँकर पलटल्याने टँकरखाली दबल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या मदतीने चालकाचा मृतदेह बाहेर काढून सावनेरला शवविच्छेदनाकरिता पाठविले. सावनेरचे ठाणेदार अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल बोरकर पुढील तपास करीत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.