संघाच्या प्रतिनिधी सभेला बेंगळुरूत सुरुवात The team’s representative meeting started in Bangalore

Share This News

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवार, १९ मार्चपासून बेंगळुरूत सुरूवात झाली. दोन दिवस चालणाऱ्या या सभेत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी उपस्थित आहेत.


चेन्नहल्ली येथील जनसेव विद्या केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या या सभेत भाजपचे अनेक मोठे नेतेही सहभागी होणार आहेत. संघाच्या इतिहासात प्रथमच नागपूरच्या बाहेर ही प्रतिनिधी सभा होत आहे. या सभेतच संघाच्या नव्या कार्यवाहांची निवड करण्यात येणार आहे. शनिवार, २० मार्चला ही निवड होणार आहे. यासाठी विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी आणि दत्तात्रय होसबळे यांची नावे चर्चेत आहेत. संघाच्या या प्रतिनिधी सभेत देशभरातील पाचशेपेक्षा अधिक स्वयंसेवक सहभागी झालेत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. संघाचे सर्व अखिल भारतीय पदाधिकारी, ११ क्षेत्रातील संघचालक, कार्यवाह, प्रचारक, ४३ प्रातांचे संघचालक, कार्यवाह आदी या सभेला उपस्थित झाले आहेत.
गेल्या १२ वर्षांपासून भय्याजी जोशी संघाच्या सरकार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या जागेवर नव्या व्यक्तीची निवड होणार असल्याने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. २००९ मध्ये भय्याजी जोशी पहिल्यांदा संघाचे सरकार्यवाह झाले होते. २०१८ मध्ये त्यांनी या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावे, अशी विनंती केली होती.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.