राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी नाकारल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळालं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली. या साऱ्या प्रकारानंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केलीय. दुसरीकडे उपमुख्यंंत्री अजित पवार यांनी मात्र मला हे प्रकरण माहिती नाही. माहिती घेऊन यावर बोलेन, असं स्पष्ट केलं आहे.
ठराविक दिवसांनी सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत कोणताही प्रतिसाद आलाच नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे.