चोरट्याने केली मंदिरातील दानपेटी लंपास,घटना सिसिटीव्हीत कैद
चोरांपासून आता मंदिरेही सुरक्षित नसल्याच चंद्रपूरातील एका घटनेने समोर आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील लखमापूर क्षेत्रातील हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांपास केली आहे, मंदिरातील दानपेटी चोरांचे हे संपूर्ण कृत्य मंदिरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. सिसिटीवी मध्ये चोरटे दानपेटी घेऊन जात असल्याचे दिसून येत आहे. या घटनेची तक्रार रामनगर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली. हनुमान मंदिराचे देखरेख करणारे सुरेश शर्मा यांनी मंदिरातील पुजारी राम तिवारी यांना मंदिराची चोरी झाली अशी सूचना दिली. त्यानंतर तात्काळ शर्मा मंदिरात पोहोचले आणि सीसीटीव्ही तील दृश्य पहिले असता त्यांना ही घटना समजली. चार वाजताच्या सुमारास एक तरुण दानपेटी घेऊन जात असल्याचे दिसले . दानपेटीत एकूण 20 ते 25 हजाराची रक्कम त्या अज्ञात तरुणाने उडवली असा अंदाज आहे, यावरून पोलिसांची चौकशी सुरू आहे.