तिसऱ्यांदा नियम मोडला, नागपुरात लॉनला ५० हजारांचा दंड|The third time the rule was broken, a fine of Rs 50,000 was imposed on a lawn in Nagpur

Share This News

नागपूर : कोरोनाविषयक नियम तिसऱ्यांदा मोडल्याने आसीनगर झोनमधील गोत्र लॉनला ५० हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई महापालिका करीत आहे. त्यातून २० प्रकरणांध्ये २ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनामुळे मंगल कार्यालय, लॉन्सवर ७ मार्चपर्यंत विवाह सोहळा व अन्य कार्यक्रमांना बंदी घातली आहे. अशात कामठी रोडवरील गोत्र लॉनला तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ५० हजारांचा दंड ठोठाविण्यात आला. गोरेवाडा भागातील राज सेलिब्रेशन लॉनमध्ये सुरू असलेल्या समारंभात दोनशेहून अधिक नागरिक आढळून आल्याने २५ हजारांचा दंड ठोठाविण्यात आला. ट्रिलियम मॉलमधील टाइम झोन या दुकानावर, गणेशपेठमधील चहाच्या टपरीवर, रिलायन्स फ्रेश, मेडिकल चौकातील वाइन शॉप आदी दुकानांच्या संचालकांवरही कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या पथकांद्वारे दिवसभरात सुमारे ९४ ठिकाणांची तपासणी करण्यात आली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.