झोपलेल्या १५ मजुरांना ट्रकने चिरडले

Share This News

गुजरातमध्ये कोसांबा येथील दुर्घटना : किम मांडवी रस्त्यावर अपघात

सुरत
गुजरातमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. सूरत जिल्ह्यातील कोसाम्बा येथे मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या अपघातात काही मजूर चिरडले गेले असून त्यापैकी अनेकांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मरण पावलेले सर्व मजूर असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
अपघाताच्या वृत्ताला दुजोरा देताना, किमान १३ जणांना ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाला असून ही घटना सुरतमधील कोसांम्बामध्ये घडली, असे स्थानिक पोलीस अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. तसेच मरण पावलेले मजूर असून ते सर्वजण मूळचे राजस्थानमधील रहिवाशी असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. घटनास्थळी उपस्थित असणार्‍या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्याकडेला झोपलेल्या मजुरांच्या अंगावर गेला. पोलिसांनी या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. रात्री या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी आणि मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून मदतकार्य सुरु आहे. दरम्यान या १३ जणांबरोबरच त्यांच्या इतर दोन सहकार्‍यांचाही नंतर मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या अपघातामध्ये सहाजण जखमी झाले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सूरतमधील पलोड गावाच्या जवळ असणार्‍या किम मांडवी रस्त्यावर हा अपघात झाला आहे. किम हाकर मार्गाजवळ एका ट्रकचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.