मेडिकलमध्ये मोकाट कुत्र्यांचाही संचार वाढला असल्याचे विडिओ शहरात चांगलाच वायरल
मेडिकलमधील अव्यवस्थेच्या कथा काही नव्या नाहीत. मात्र, आता मेडिकलमध्ये मोकाट कुत्र्यांचाही संचार वाढला असल्याचे विडिओ शहरात चांगलेच वायरल झाले आहे , यानंतर खडबडून जागे झालेल्या मेडिकल प्रशासनाने चौकशी समिती गठीत केली आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. संक्रमणकाळात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी विविध रुग्णालयात वेगळे वॉर्ड तयार करण्यात आले. त्याच र्शुंखलेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले. येथील कोविड वॉर्डात मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. मेडिकल परिसरात कुत्र्यांचा वावर नवा नाही. मात्र, कोविड वॉर्डात जेथे डॉक्टरांशिवाय अन्य कोणालाही जाण्याची परवानगी नाही, तेथे श्वानाचा संचार पाहायला मिळाल्यामुळे खळबळ उडाली. सोमवारी रात्री येथे एका मोकाट कुत्रा शिरला. रुग्णांच्या बेडजवळ ठेवण्यात आल्या ‘डस्ट बिन’मध्ये हा कुत्रा अन्न शोधत होता. याचा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या वॉर्डातील सुरक्षा रक्षक झोपलेला असून, कुत्रा आतमध्ये भुंकत असतानाही त्याने कानाडोळा केल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. कोविड वॉर्डातील कचरा हा बायोमेडिकल वेस्ट या श्रेणीत येतो. त्याची योग्यरितीने विल्हेवाट लावली जाते. तो इतरत्र फेकला जात नाही, हे विशेष. दरम्यान प्रशासनाने चौकशी समिती गठीत केली आहे. समिती दोन दिवसांत रिपोर्ट देईल. तर या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे मेडिकलचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले