माजी आमदाराच्या नागपुरातील घरात चोरी|Theft at the house of a former MLA in Nagpur

Share This News

नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील माजी आमदार संजय पुराम यांच्या वडिलांकडे झालेल्या चोरीत चोरट्यांनी रोख रकमेसह सहा लाखांचे दागिने लंपास केले.
शुक्रवार, ५ मार्चला सकाळी बेलतरोडीतील गोंडवानानगर येथे ही घडना उघडकीस आली. जानूभाऊ पुनाजी पुराम (वय ७२) यांचे हे घर आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. संजय पुराम याच्याकडे ४ मार्चला कार्यक्रम होता. त्यासाठी त्यांचे वडिल जानूभाऊ कुटुंबीयांसह गोंदिया येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी मुख्य दाराचे दाराचे कुलूप तोडले. घराच्या आलमारीतील २५ हजारांची रोख, घड्याळ व दागिने चोरी केले. शुक्रवारी सकाळी शेजाऱ्यांना पुराम यांच्या घराचे दार उघडे दिसले. त्यांनी जानूभाऊ यांना त्याची माहिती दिली. माहिती मिळताच जानूभाऊ नागपुरात आलेत. त्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर जानूभाऊंनी बेलतरोडी पोलिसांत तक्रार दिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.