बर्ड फ्ल्यू सावटातही पोल्ट्री फार्म मधून ४०० कोंबड्यांची चोरी | Theft of 400 chicken’s from poultry
Theft of 400 chicken’s from a poultry
भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सिरसोली गावातील संजीव मुरकुटे यांच्या पोल्ट्री फार्म मधुन तब्बल ४०० कोंबड्यांची चोरीला गेल्याने शिरसोली गावात खळबळ उडाली आहे, या संदर्भात मुरकुटे यांनी . आंधळगाव पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आपण चोरीच्या अनेक घटना पाहतो कुठे दागिने,कुठे पैसै,तर कुठे मोटरसायकल अशा विविध चोऱ्या होताना ऐकतो .मात्र आता पोल्ट्री फॉर्म मधून कोंबड्या चोरी होताना कधी ऐकलं काय हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील शिरसोली गावात ही घटना घडली आहे, संजीव मुरकुटे हे पोल्ट्री व्यावसायिक मागिल अनेक वर्षापासून पोल्ट्रीचा व्यवसाय करित आहेत, रविवारच्या रात्री संजीव हे पोल्ट्री फार्म मधुन घरी परतले असता दुसऱ्या दिवसी सकाळी पोल्ट्री फार्म वर जाऊन पाहिल्यावर त्यांनी पोल्ट्री फॉर्म मधील दाराचा कुलूप तुटला दिसला असून आत कोंबड्या नसल्याने पोल्ट्री फॉर्म मधून कोंबड्या चोरीला गेल्याचे समजताच त्यांना धकाच बसला संजीव यांनी आंधळगाव पोलिस स्टेशन गाठत अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. आधीच कोरोनाच्या काळात पोल्ट्री व्यावसायिक डबघाईला आले आहेत, कसे बसे सावरले असताना पोल्ट्री व्यवसाय सुरु केला . त्यांनतर बर्ड फ्ल्यूचा सावट असताना आता कोंबड्याच चोरीला गेल्या मंटल्यावर पोल्ट्री व्यावसायिक यांनी काय करावं अशा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित होत आहे.