सानगडीतील स्टेट बँकेत ३२ लाख रुपयांची चोरी

Share This News

गॅस कटरने तिजोरी फोडली

भंडारा
खिडकी तोडून आत प्रवेश करीत गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडून सुमारे ३२ लाख रुपये रोख अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना स्टेट बँक शाखा सानगडी येथे सोमवारी (ता. २१) रात्रीच्या सुमारास घडली.
सानगडी येथील वार्ड क्र. ३ मधील पोलिस चौकीपासून काही अंतरावर गोविंदराव ब्राम्हणकर यांच्या घरासमोरील इमारतीत स्टेट बँकेची शाखा आहे. दरम्यान, सोमवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँक शाखेची मागील खिडकी तोडून आत प्रवेश केला. तसेच गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरीला भोक पाडून ३२ लाख रुपये चोरून नेले. सदर तिजोरीत सोन्याचांदीचे दागिने व रोकड असल्याची माहिती आहे. बँक शाखेच्या कर्मचार्‍यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर साकोलीचे ठाणेदार पोलिस उपअधीक्षक काटे, जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, उपअधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी श्‍वानपथक व फिंगरप्रिंट एक्सपर्टनी शोधमोहीम सुरू केली. सदर बँक इमारतीची सुरक्षा व्यवस्था अगदी ढिसाळ असून शाखा व्यवस्थापक गोंदियावरून तर इतर कर्मचारी, साकोली, भंडार्‍यावरून ये- जा करीत असल्याची माहिती आहे. तसेच रात्रीच्या वेळी बँकेत सुरक्षा व्यवस्थेसाठी चौकीदार नव्हता. मुख्य दाराच्या किल्ल्या साफसफाई व स्वच्छतेसाठी रोजंदारीवर असलेल्या कर्मचार्‍याकडे ठेवल्या जात असल्याची माहिती आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली असून वृत्त लिहिपयर्ंत चोरी गेलेल्या मुद्देमालाची मोजणी सुरू होती.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.