अजूनदेखील लोकांच्या मनात लसीविषयी बरेच गैरसमज There are still a lot of misconceptions about vaccines in people’s minds

Share This News

आपले लसीकरण तिसऱ्या टप्प्यात असताना अजूनदेखील लोकांच्या मनात लसीविषयी बरेच गैरसमज आहेत. लसीकरण सुरू झाल्यानंतर काही डॉक्टर मित्रांचे देखील लस घ्यावी किंवा नको अशी विचारणा करणारे फोन आले, त्यामुळेच लसीकरणा विषयी थोडे सविस्तर लिहितोय.


लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी (पहिल्या डोस नंतर सहा आठवड्यांनी) लसीचा पूर्ण फायदा अपेक्षित असतो. पहिला डोस घेतल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी आपल्या शरीरात प्रतिबंधक antibodies तयार होण्यास सुरुवात होते आणि सहा आठवडे ते बारा आठवडे या कालावधीत हे antibody titre अपेक्षित पातळीपर्यंत पोहोचते असे आजपर्यंतच्या निरीक्षणात आढळले आहे. लस घेतल्यानंतर पहिल्या 48 तासात दिसणारी लक्षणे – ताप येणे,अंग दुखणे, इंजेक्शनच्या जागी सूज येणे, थकवा जाणवणे ही लक्षणे म्हणजे लसीमुळे आपली प्रतिकारक्षमता (Immunity) उद्दिपित झाल्याची लक्षणे असतात (हे लसीचे साईड इफेक्ट्स नाहीत) त्यामुळे या लक्षणांना घाबरण्याचे कारण नाही. ज्यांना कोणत्याही औषधाची, अन्नघटकांची तीव्र ॲलर्जी असेल त्यांनी vaccine थोडे थांबून घ्यावे असे सुरुवातीला सांगितले जात होते, परंतु आता mass vaccination नंतर अशा ॲलर्जी असणाऱ्या रुग्णांना देखील लसीमुळे काही ॲलर्जी किंवा दुष्परिणाम झाल्याचे आढळले नाही. त्यामुळे Covishield लस कोणी घेवू नये या (Absolute contraindication for vaccination) कॅटेगरी मध्ये फक्त एकाच प्रकारचे रुग्ण येतात, ज़्यांना लसीच्या पहिल्या डोस ची ॲलर्जी होते किंवा reaction येते. Covishield लसीच्या बाबतीत आजपर्यंत अशी ॲलर्जीची एकही घटना घडलेली नाही.
त्यामुळे लस घेण्यासाठी घाबरण्याचे काहीच कारण नाही.
सध्या सोशल मीडिया मार्फत मिळणाऱ्या माहितीमध्ये शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेल्या सकारात्मक माहिती ऐवजी नकारात्मक अफवांवर जास्त विश्वास ठेवला जातो आणि त्यामुळेच बहुंताशी लोक हे करोनाचा जंतुसंसर्ग किंवा COVID चा गंभीर आजार यांना घाबरत नाहीत परंतू लस घ्यायला घाबरतात. त्यामुळेच मागील एक वर्षभर संसर्ग झाला नाही परंतु लस न घेतल्याने मगील काही दिवसात संसर्ग होवून ICU मध्ये admit असलेले काही health workers सध्या आम्ही पाहतोय.
लसीचे दोन डोस घेवून सुद्धा करोना चा जंतुसंसर्ग झाला अशा headlines बातम्यांमध्ये आपण नेहमीच पाहतो. आणि लगेच लसीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, पण आपण लसीच्या ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यातील माहिती पाहिली तर त्यामधे असे म्हटले आहे की Covishield लशीची परिणामकारकता साधारणतः 69% आहे, म्हणजेच समजा शंभर लोकांना लस दिली तर 69 लोकांना संसर्ग होत नाही, 31 लोकांना संसर्ग होतो , परंतू लसीमुळे तयार झालेल्या Immunity मुळे त्यातील काही जण लक्षणविरहित ( asymptomatic) राहतात, काही जणांना सध्या फ्लू प्रमाणे किरकोळ लक्षणे जाणवतात आणि नेहमीची ताप, सर्दीची औषधे घेवून ते बरे होतात, मात्र कोणालाही admit करण्याची गरज लागत नाही किंवा आजार वाढत नाही .
त्यामुळे “लस दिली आणि तरीही करोनाचा संसर्ग झाला” यात ब्रेकिंग न्युज करण्या सारखं काही नाही. लस घेतल्यामुळे आजार न वाढणे, हॉस्पिटल मध्ये admit होण्याची गरज न लागणे, आणि संभाव्य मृत्यू टाळणे हेच लसीकरणाचे मोठे फायदे आहेत.
लस घेतल्यानंतर पण संसर्ग होवू शकतो, त्या व्यक्तीकडून इतरांना पसरू शकतो आणि हे टाळण्यासाठीच लसीकरण झाल्यानंतर सुद्धा मास्क वापरणे, इतर काळजी घेणे गरजेचे आहे.
मागील वर्षभरात वेगवेगळ्या अफवांमुळे रुग्णांवर झालेले गंभीर परिणाम सर्वच डॉक्टरांनी अनुभवले आहेत. करोनाची साथ हे एक मोठे रॅकेट आहे, आम्ही करोनाला घाबरत नाही, आम्हाला काही होत नाही असे म्हणणारे तरुण शूरवीर हा संसर्ग आपल्या घरापर्यंत घेवून गेले, स्वतः बरेही झाले पण त्यांच्याच घरातील काही ज्येष्ठ नागरिक आजाराला बळी पडले, काहीना ICU treatment ची गरज लागली आणि आजारातून बरे झाले पण त्यांना श्वसनाच्या आणि इतर समस्या अजूनही चालू आहेत. आजार बळावल्यानंतर उशिरा हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये complications निर्माण झाले.


या सर्व अनुभवातून असे जाणवते की नकारात्मक अफवांवर विश्वास ठेवण्या पेक्षा सकारात्मक, शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेल्या माहितीवर विश्वास ठेवून आपण योग्य ती काळजी घेतली तर भविष्यातील बरेच नुकसान आपण टाळू शकतो.


लस ही आजारापासून बचाव करण्यासाठी आहे , पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. लस घेणं बंधनकारक नसलं तरी आपल्या फायद्याचं निश्चितच आहे.
🙏🙏


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.