रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवणार: राजेंद्र शिंगणे

Share This News

मुंबई : राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी राज्यात येत्या तीन ते चार दिवसात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. लस केव्हा आणि कशी वापरायची याचा प्रोटोकॉल पाळल्या जात नसल्याने पॅनिक स्थिती निर्माण झाल्याचं राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं.
राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. रेमडेसिवीरबाबत आम्ही टेंडर मागविले आहेत. मात्र रेमडेसिवीरच्या किंमतीबाबत कंपन्यांचा गैरसमज झालेला आहे. आम्ही कमी किंमतीत रेमडेसिवीर खरेदी करणार नाही. आम्हाला कंपन्यांचं नुकसान करायचं नाही, असं शिंगणे यांनी सांगितलं. राज्यात रेमडेसिवीरचा साठा कमी असून येत्या 3-4 दिवसात रेमडेसिवीरचा तुटवडा अधिकच जाणवणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. काही कंपन्यांनी राज्याला रेमडेसिवीरचा कमी पुरवठा केला. त्यामुळे खासगी रुग्णालयातही रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे, असं सांगतानाच रेमडेसिवीर कधी आणि कसं वापरायचं याचा प्रोटोकॉल पाळला नाही. त्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला असून ज्यांना गरज आहे, त्यांनाच हे इंजेक्शन द्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.