अमरावती मार्गावर होणार दोन उड्डाणपूल

Share This News

नागपूर : प्रचंड वर्दळ असलेल्या अमरावती मार्गावर दोन नव्या उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या उड्डाणपुलांची उभारणी करणार आहे.
गिरीपेठेतील आरटीओ कार्यालय ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या मार्गावर पहिला उड्डाणपूल असेल. दुसरा उड्डाणपूल गुरद्वारा ते ऑर्डनन्स फॅक्टरीच्या पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत असेल. सध्या शहरात वर्धा मार्गावरील डबलडेकर उड्डाणपूल, मनीषनगर रेल्वे ओव्हर ब्रीज, चिंचभुवन उड्डाणपूल, वंजारीनगर ते अजनी उड्डाणपूल नव्याने उभे झाले आहेत. त्यात आता आणखी दोन पुलांची भर पडणार आहे. दोन नव्या उड्डाणपुलांमुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेळ ३० ते ४५ मिनिटांनी वाचणार आहे. लवकरच दोन्ही पुलांचे बांधकाम सुरू होणार आहे. आरटीओ कार्यालयापासून सुरू होणारा पूल २.९ किलोमीटरचा व चौपदरी असेल. यासाठी २३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गुरुद्वारपासून सुरू होणारा पूलही चौपदरी राहणार आहे. तो १.८ किलोमीटरचा राहणार असून त्यासाठी सव्वाशे कोटींचा खर्च येणार आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.