कोविड सेंटरमधून पळालेले ते अखेर परतले

Share This News

यवतमाळ
करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनासह प्रशासन प्रयत्नशिल असताना बेजबाबदार नागरिक या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. जिल्ह्यातील घाटंजी येथे असाच एक संतापजनक प्रकार घडला. येथील आयटीआय कॉलेजमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरमधून तब्बल २0 करोनाबाधित रुग्णांनी पलायन केले होते. प्रशासनाच्या प्रयत्नानंतर या वीस जणांना पुन्हा कोविड सेंटरमध्ये परत आणण्यात यश आले आहे. येथील आयटीआय कॉलेजमध्ये कळक असलेल्या कोविड केअर सेंटरमधून तब्बल २0 करोनाबाधित रुग्णांनी पलायन केल्याचे समोर आले. यानंतर प्रशासनाने शोधमोहीम राबवून सापडलेल्या काही रूग्णांना गृहविलगीकरणात ठेवले. काल शनिवारी घाटंजी तालुक्यात ४५ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांना गृहविलगीकरणात ठेवण्यात येते. शुक्रवारी तालुक्यातील आमडी येथे कोरोना चाचणी शिबीर घेण्यात आले. या ठिकाणी तब्बल १७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या.
त्यांना घाटंजी येथे आयटीआय कॉलेजमध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला दाखल करण्यात आले होते. दरम्यान, काल शनिवार) या कोविड केअर सेंटरमधून तब्बल २0 करोनाबाधित पळून गेल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाच्या पायाखालीची जमीन सरकली. अखेर या सर्वांना शोधण्यात आले. अखेर २0 जण कोरोना सेंटर मध्ये पुन्हा परत आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी या रुग्णांना पुन्हा दाखल करुन घेतले आहे. कोरोना सेंटरवर आता पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोरोना सेंटरमधून पळून गेलेले हे रुग्ण आमडी नावाच्या एकाच गावातील आहेत.
या सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे होती. या कारणामुळे त्यांना घाटंजीच्या कोरोना सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. लक्षणे सौम्य असल्याने या रुग्णांना फारसा त्रास नव्हता. प्रशासन कोरोनाचे कारण समोर करीत आपल्याला उगीच डांबवून ठेवत असल्याची भावना या रुग्णांमध्ये होती.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.