दहावी, बारावी सरसकट पास करण्यावर विचार

Share This News

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना त्याच्या संसर्गापासून वाचविणे गरजेचे आहे. अशात राज्य सरकार दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेऊ शकते असे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संबंधित विभाग लवकर निर्णय घेऊ शकते, असे ते म्हणाले.
सरसकट राज्यात लॉकडाउन करणे अर्थकारणाच्या दृष्टीने परवडणारे नाही. त्यामुळे राज्य सरकार पर्यायी मार्ग शोधत आहे. अशात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावी आणि बारावी परीक्षांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोरोनाच्या प्रकोपात परीक्षा घेणे योग्य ठरेल काय, याची चाचपणी राज्य सरकार करीत आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच निर्णय होऊ शकतो, असे वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर शुक्रवार, २६ फेब्रुवारीला आगमन झाल्यानंतर सांगितले. विद्यार्थ्यांना सरसकट पास करायचे की त्यांची ऑनलाइन परीक्षा घ्यायची, यावर सरकार विचार करीत आहे. तामिळनाडूत मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांनी नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र सरकार कोणता निर्णय घेणार याकडे पाहिले जात आहे. तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार लवकर योग्य तो निर्णय घेईल, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.