सफेलकर आणि टोळीवर अवैध कब्जाचा तिसरा गुन्हा दाखल

Share This News

नागपूर दि. 9 एप्रिल
रंजित सफेलकर आणि त्याच्या टोळीवर एका ढाबा आणि ४ दुकाने अवैधरित्या ताब्यात घेऊन मूळ मालकाला जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे अवैध कब्जा प्रकरणात सफेलकर आणि टोळीवर हा तिसरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, भिलगाव येथे राहणारे डुमन र्शावन प्रगट (५१) यांनी मौजा खैरी खसरा क्र. ६0/२ मधील जमीन ज्यावर अडीच आर क्षेत्रावर पक्के बांधकाम केले होते. त्यात खाली ढाबा आणि पहिल्या मजल्यावर ४ रूम बांधलेले होते. ढाब्याच्या बाजूला दोन रूम बांधलेले होते. तर उर्वरित मोकळे क्षेत्र असे बांधकाम केले होते. ती जागा त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे होती. प्रगट यांची ती जागा जितंेद्र कटारिया याने स्टॅम्प पेपरवर किरायापत्र तयार करून साईनाथ डनलप (ढाबा अँण्ड रेस्टॉरंट) या व्यवसायाकरिता १२ हजार रु. प्रति महिना किरायाने घेतली होती. जितेंद्र कटारियाने सुरुवातीला वर्षभर कधी १ हजार रु. तर कधी २,000 रु. तर कधी ५000 रु. असा किराया दिला. त्यानंतर त्याने कधीच किराया दिला नाही. प्रगट कधी त्याला ढाब्यावर पैसे मागण्यासाठी गेले तर तेथे रंजित सफेलकर, कालू हाटे, भरत हाटे व त्यांचे इतर साथीदार हे तेथेच बसले असायचे. कालू हाटे हा गल्ल्यावर बसायचा. हे सर्व लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने प्रगट त्यांना घाबरून होते.
त्यानंतर त्यांनी सदर १४ आर क्षेत्र त्यातील दुकान आणि ६ रूम बांधकामासह मायक्रो पार्क लॉजिस्टिक प्रा. लि. तर्फे दिलीप ठाकुरदास पारिख यांना विकले. त्यानंतर प्रगट आणि त्यांचा भाऊ महेश प्रगट, अनिकेत प्रगट, लक्ष्मीबाई काशीराम प्रगट, पंकज प्रगट असे जितेंद्र कटारिया यांना ढाब्यावर भेटून आमचे दुकान व सर्व जागा आम्ही विकली आहे, तुम्ही दुकान रिकामे करा, असे वारंवार सांगू लागले. पण, कटारियाने दुकान रिकामे न करता सफेलकरशी बोलायला सांगितले. प्रगट यांना कटारियाने वकिलामार्फत नोटीसही पाठविले होते. त्यानंतर त्या जागेचा व्यवहार जितेंद्र कटारिया याच्यासोबत १ कोटी १0 लाख रुपयात तोंडी करार साक्षीदारांसमक्ष झाल्याचे कथन करून खोटी नोटीस बजावली. त्याने खोटी नोटीस पाठवल्यानंतर प्रगट यांनी कामठी पोलिस स्टेशनला व महावितरण कार्यालयास जितंेद्र कटारिया याच्याविरुद्ध जमीन खरेदी-विक्रीचा तोंडी करार झाल्याचे सांगून फसवणूक केल्याबाबत तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर महावितरणाने तेथील मीटर काढले. जितेंद्र कटारिया याने सिव्हिल कोर्ट नागपूर येथे लाईट कापल्याबाबत केस केली.

फिर्यादी वकिलामार्फत कोर्टात त्यांचे म्हणणे मांडले असून, या प्रकरणी केस सुरू आहे. त्यानंतर कटारिया याने प्रगट यांच्या जागेवर बोर्ड लावला की, ही जागा जितेंद्र प्रतापराव कटारिया यांच्या मालकीची आहे. कटारियाने प्रगट यांच्या इतर ४ दुकांनाचे कुलूप तोडून तेही ताब्यात घेतले. त्यानंतर रंजित सफेलकरने प्रगट यांना त्याच्या कामठी रोडवरील मंदिराच्या बाजूच्या ऑफिसमध्ये बोलावले. तेथे रंजित सफेलकर, कालू हाटे, भरत हाटे, जितेंद्र कटारिया, प्रताप कटारिया अण्णा असे सर्व हजर होते .तेव्हा रंजित सफेलकरने प्रगट यांना मारहाण केली. पण, सफेलकर याला अटक होताच प्रगट आणि त्यांच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार केली. त्यामुळे जितेंद्र कटारियासोबत सफेलकर आणि टोळीवर अवैध कब्जाचा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.