भंडाऱ्यातील घटनेनंतर महापालिका रुग्णालयांमध्ये तातडीने ही व्यवस्था करावी-वीरेंद्र कुकरेजा

Share This News

आरोग्य समिती सभापती.

महापालिका इमारतींमध्येही उपाययोजना नाही
नागपूर महापालिकेच्यावतीने व्यापारी इमारती, अन्य इमारती तसेच मोठे मॉल, सिनेमागृहे आदींना फायर ऑडिट करण्याचे तसेच येथे फायर उपकरणे बसविण्यासंदर्भात सांगण्यात येते. ही उपकरणे नसल्यास अशा इमारतधारकांवर कारवाई करण्यात येते. परंतु, महापालिकेच्या रुग्णालयांसह शासकीय इमारतीमध्येही कुठल्याही प्रकारचे अग्निशामक उपकरणे लावण्यात आलेली नसल्याचे दिसून येते.महापालिकेच्या अखत्यारित तीन रुग्णालये येतात. येथे कुठल्याही प्रकारचे फायर इक्विपमेंट बसविण्यात आलेले नाही. यापूर्वी बैठकांच्या माध्यमातून सुरक्षात्मक उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून उपरोक्त उपाययोजना करण्यास सांगण्यात आले होते. भंडार्‍यातील घटनेनंतर महापालिका रुग्णालयांमध्ये तातडीने ही व्यवस्था करावी, तसेच महापालिकेच्या सर्व इमारतींचे फायर ऑडिट व्हावे, येथे अग्निशामक उपकरणे बसविण्यात यावी, याबाबत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना सोमवारी पत्र पाठविण्यात येईल. लवकरात लवकर ही व्यवस्था उभारावी, याकरिता पाठपुरावा करण्यात येईल.
वीरेंद्र (विक्की) कुकरेजा
आरोग्य समिती सभापती, नागपूर महानगरपालिका


भंडारा जिल्हय़ातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर आता नागपूर शहरातील मेडिकल, मेयो रुग्णालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करण्यात येत आहे. तर नागपूर महापालिकादेखील रुग्णालयांसह मनपा इमारतीची तपासणी करणार आहे.
शहरात नागपूर महापालिकेचे तीन रुग्णालये आहेत. इंदिरा गांधी रुग्णालय (गांधीनगर), पाचपावली आणि आयसोलेशन रुग्णालयामध्ये फायर सुरक्षात्मक उपायोजना करण्यात आलेली नाही. बाल शिशू रुग्णालयातील स्थितीदेखील अशीच आहे. भंडार्‍याच्या घटनेनंतर आता महापालिका खडबडून जागी झाली आहे. आता या सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात येणार असून, सुरक्षात्मक उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून फायर इक्विपमेंट बसविण्यावर भर देण्यात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य समिती सभापती वीरेंद्र (विक्की) कुकरेजा हे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना पत्र देणार आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.