असा होईल दिवसाआड पाणीपुरवठा This will be the water supply during the day

Share This News

नागपूर : शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या पेंचच्या २३०० व्यासाच्या जलवाहिनीवार पाच ठिकाणी सुरू असलेली गळती दुरुस्त करण्यात येणार आहे. यामुळे ६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ६०टक्के शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. ६ जानेवारीला पाणीपुरवठा होणाऱ्या जलकुंभावरून ७ जानेवारीला पाणीपुरवठा होणार नाही, तर ७ जानेवारीला पाणीपुरवठा होणाऱ्या जलकुंभावरून ८ जानेवारीला पाणीपुरवठा होणार नाही. अशाप्रकारे ६ फेब्रुवारीपर्यंत दिवसाआड पाणी मिळणार आहे. ६ जानेवारीला पाणीपुरवठा होणारे जलकुंभ –

लक्ष्मीनगर झोन : खामला, प्रतापनगर, गायत्रीनगर, लक्ष्मीनगर जुनी कमांड एरिया, त्रिमूर्तीनगर, टाकळी सीम, जयताळा जी. एस. आर. कमांड एरिया. धरमपेठ झोन : दाभा आणि टेकडीवाडी, सेमिनरी हिल्स, रामनगर, जीएसआर आणि फुटाळा लाईन कमांड एरिया. हनुमाननगर झोन : सीताबर्डी फोर्ट-१ , सीताबर्डी फोर्ट-२, किल्ला महाल. मंगळवारी झोन : गिट्टीखदान जीएसआर कमांड एरिया. … ७ जानेवारीला पाणीपुरवठा होणारे जलकुंभ लक्ष्मीनगर झोन : गव्हर्नर हाऊस बर्डी कमांड एरिया, धंतोली इएसआर कमांड एरिया. हनुमाननगर झोन : ओमकार नगर नवीन आणि ओमकार नगर एक्सीस्टिंग कमांड एरिया, श्रीनगर जलकुंभ, म्हाळगीनगर कमांड एरस, नलंदा नगर जलकुंभ. धंतोली : रेशीमबाग , हनुमाननगर, वंजारीनगर जलकुंभ १ व २ सतरंजीपुरा झोन : बोरियापुरा, बोरियापुरा फिडर मेन. आसीनगर झोन : नारी जलकुंभ, नारा, जलकुंभ, जरीपटका मंगळवारी झोन : गोरेवाडा प्रपोस्ड (गिट्टीखदान जीएसआरवरून) कमांड एरिया, गव्हर्नर हाऊस राजनगर आणि सदर कमांड एरिया.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.