दिल्ली हिंसाचार प्रकरणी आणखी तिघांना अटक

Share This News

नवी दिल्ली, 06 फेब्रुवारी : राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी 3 आरोपींना अटक केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिन्ही आरोप बुराडी आणि लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात सामील होते. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणाच्या तपासासाठी नेमणूक करण्यात आलेल्या एसआयटीने या तिघांना अटक केली आहे. यापूर्वीही एसआयटीने दिल्ली हिंसाचार प्रकरणी 2 जणांना अटक केली होती. आता लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 5 आरोपींना अटक झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या एसआयटीने 25 संशयीत आरोपींचे चित्र प्रसिद्ध केले होते. या फोटोंमध्ये दीप सिद्धूचाही समावेश आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.