तीन दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर |
पुलवामा येथील टिकन गावात संरक्षण दलाने एकीकडे दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली, त्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. बारामुल्ला जिल्ह्यातील सिंहपुरा गावच्या मुख्य बाजारात दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात चार नागरिक जखमी झाले. बाजारपेठेत उभे असलेल्या संरक्षण दलावर ग्रेनेड टाकला गेला. पण तो त्यांच्यापयर्ंत पोहोचला नाही. संरक्षण दलाने स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सकाळी हा ग्रेनेड हल्ला करण्यात आला. सिंहपोरा गावच्या मुख्य बाजारात जेव्हा संरक्षण दलाचे पथक उभे होते तेव्हा अचानक स्फोट झाला. हल्लेखोर कोण होते हे कळाले नाही. त्यानंतर ग्रेनेड फेकणार्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी जवानांनी या भागाला वेढा घालण्यास सुरुवात केली आहे. एसओजी, सेना आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुरक्षा दलाच्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. |