कडक निर्बंधांनंतरही विदर्भात तीन हजारांवर बाधित |Three thousand affected in Vidarbha despite strict restrictions

Share This News

नागपूर : विदर्भात संपूर्ण संचारबंदी, कडक निर्बंध लागू करण्यात आल्यानंतरही सातत्याने कोरोना रुग्णवाढ नोंदविली जात आहे. तपासण्यात आलेल्या एकूण नमुन्यांमध्ये ३ हजार १३३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. विदर्भातील आतापर्यंत ३ लाख १३ हजार ६५० कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील २ लाख ८४ हजार २६५ बरे तर ७ हजार ३४३ उपचारादरम्यान दगावले आहेत.
कोरोनामुळे यवतमाळ जिल्ह्यात तिघांचा मृत्यू तर २४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यवतमाळ शहरात ११३ रुग्णांची नोंद झाली आहे. १५४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले. सध्या जिल्ह्यात १ हजार ४२७ सक्रिय रुग्ण आहेत. बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या अडीच हजारांवर पोहोचली आहे. २४ तासांत ३९१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जळगाव-जामोद तालुक्यात १५५ रुग्ण बाधित झालेत. चंद्रपूर जिल्ह्यात २४ तासांत १८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ४५ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. चंद्रपुरात आतापर्यंत २ लाख १३ हजार ११७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ८७ हजार ६४४ नमुने निगेटिव्ह आहेत. भंडारा जिल्ह्यात २१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. २४ तासांत ४४ नवे बाधित आढळले. गोंदिया जिल्ह्यात ११ पॉझिटिव्ह आढळले. वर्धा जिल्ह्यात १७५ नवे रुग्ण आढळले. मागील दोन आठवड्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी ११२६ने वाढली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आहे. २४ नवे बाधित आढळले आहेत.

अमरावतीत परिस्थिती गंभीर संसर्गवाढ कायम
अमरावतीच्या रुग्णसंख्येत ७५४ संख्येची भर पडली आहे. आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ३३ हजार ५८५वर पोहोचली आहे. अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता शहरात अकारण फिरणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.