तीन आठवड्यांचे कठोर लॉकडाऊन हवे -वडेट्टीवार

Share This News

चंद्रपूर ः एकीकडे लॉकडाऊनला व्यापाऱ्यांसह अनेक वर्गांकडून तीव्र विरोध सुरु असताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात तीन आठवड्यांचा कठोर लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले आहेत.
एका वाहिनीशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असून रोज किमान पन्नास हजार रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे आता आणखी कठोर उपाययोजनांची गरज आहे. सध्या शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार असली तरी ते पुरेसे नसून तीन आठवड्यांचे संपूर्ण लॉकाडाऊन लावावे लागेल, असे संकेत त्यांनी दिले. अशा लॉकडाऊनसाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
केंद्र सरकारने मदतीचा हात आखडता घेतला असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.