सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

Share This News

चिमूर
पूर्वी पारंपरिक पद्धतीने होत असलेल्या सलून व्यवसायाने आता कात टाकली आहे. मात्र हातावर पोट अशीच या व्यवसायाची ओळख असून कोरोनामुळे निबंधार्चे लागलेले ग्रहण सुटत नसल्याने आता आम्ही पोट कसे भरायचे असा प्रश्न या व्यावसायिकांना समोर उभा ठाकला आहे. हे असेच निबर्ंध राहिल्यास सलून व्यवसायिकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.
कोरोनाची दुसरी लाट भयंकर असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निबर्ंध घालत ३0 एप्रिलपयर्ंत सलून बंद राहणार असल्याचे नमूद केले आहे त्यामुळे आता नागरिकांना घरातच महिनाभर केस दाढी करावी लागत आहे. चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात बरेच सलून व्यवसायिक या व्यवसायावर आपली उपजीविका करतात या व्यवसायावर या कामगारांची चूल पेटते परंतु शासनाने मिनी लॉकडाऊन सुरू केल्याने सलून व्यावसायिकांच्या रोजगार बुडाला आहे. मागील वर्षीही लॉकडाऊनमध्ये हा व्यवसाय सहा महिने बंद होता. यात सर्वात शेवटी सलून व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली होती. मागील लॉकडाऊनमध्ये व्यावसायिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला मागील वर्ष उसनवारी घेऊन कसेबसे चालविले आता तरी यावर्षी व्यवसाय सुरळीत चालेल व या व्यवसायातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू अशा विचारात असलेल्या सलून व्यवसायावर आणखी गदा आल्याने महाराष्ट्रात २१ सलून व्यावसायिकांनी आत्महत्याही केल्या. सलून व्यावसायिकांना शासनाने मदत करायला हवी होती परंतु आता पयर्ंत सरकारने या व्यावसायिकांसाठी कोरोनाच्या बंद काळात कोणत्याच प्रकारे मदत न केल्याचे त्यांचे म्हणणे हा व्यवसाय अगदी दोन तीन महिन्यापूर्वीच नियम पाळून सुरू झाला होता मात्र पुन्हा महिनाभर बंद करण्याची वेळ आल्याने त्यांच्यासमोर आता जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.