राज्यात १ लाख घरे बांधणार; गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा

Share This News

औरंगाबाद : राज्यातील पोलिसांसाठी १ लाख घरे बांधण्याची योजना असून राज्य सरकारकडून अर्थसाहाय्य न घेता ही योजना राबविली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी ‘लोकमत भवन’ येथे केली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास अहवाल सीबीआयकडे मागितला आहे, परंतु सीबीआयने त्यावर राज्य सरकारला अजूनही उत्तर दिलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. गृहमंत्री देशमुख यांनी शुक्रवारी ‘लोकमत भवन’ला भेट दिली. यावेळी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. कोरोना काळात राज्यातील पोलिसांनी जीवाची पर्वा न करता अतुल्य कामगिरी बजावली. यावर गृह विभागाने ‘अतुल्य हिंमत’  हे कॉफी टेबल बुक काढले आहे. त्याची प्रतही त्यांनी राजेंद्र दर्डा यांना भेट दिली. जगभरात सायबर गुन्हे वाढत आहेत. ५ ट्रिलियन डॉलर एवढा हा व्यवहार आहे. ते रोखण्यासाठी मुंबईत ५ अद्ययावत सायबर गुन्हे पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. पोलीस दलात साडेबारा हजार शिपायांची भरती करायची आहे, आणि त्यापैकी ५,३०० पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहितीही  गृहमंत्री देशमुख यांनी दिली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.