सलून व्यावसायिकांचे आज आंदोलन

Share This News

नागपूर
राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडॉऊनच्या विरोधात गुरुवार दि. ८ एप्रिल २0२१ रोजी सकाळी ११ ते १२ पयर्ंत सलून व्यवसायिक काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहेत. आपल्या दुकानासमोर उभे राहून शासनाच्या या आदेशाचा निषेध करण्यासाठी आदेश पत्राला जाळून प्रतिकात्मक होळी करणार असल्याचे महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नागपूर जिल्हातर्फे कळविण्यात आले.
कोरोना संक्रमणामुळे राज्य शासनाने ३0 एप्रिलपर्यंत जाहीर केलेला लॉकडॉऊन व त्यादरम्यान सलून व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय, सलून व्यावसायिकांसाठी अन्यायकारक आहे. यामुळे सलून व्यावयासयिकांचा जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. दुकानाचे भाडे, वीजबिल व इतर मेन्टेनन्स कसे करायचे? हा जीवाला घोर लावणारा प्रश्न निर्माण झालाय. यासाठी नागपूर जिल्हा स्तरावर शासनाचा निषेध करून या निर्णयाची होळी पेटवून, राज्य शासनाचा विरोध करण्यात येणार आहे.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.