आज जिल्ह्यात 663 तर गोंदिया शहरात 410 कोरोना पॉझिटिव्ह,4 मृत्यू

Share This News

प्लाझ्माची गरज असताना मशीन बंद,डाँक्टरांचा नागपूरातील रक्तपेढीशी संबधगोंदिया,दि.9: गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज जिल्ह्यात दुपारपर्यंत कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक विस्फोट होत जिल्ह्यात 663 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.तर 27 रुग्णांना आज सुट्टी देण्यात आली.आज 4 रुग्णाचा मृत्यू झाला.तर आजपर्यंत 19459 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 15784 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 3464 आहे. 2537 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 211 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 85.79 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.1 टक्के आहे तर डब्लिंग रेट 180 दिवस आहे.रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया-410, तिरोडा-104, गोरेगाव-33,आमगाव-37, सालेकसा 19, देवरी-06, सडक अर्जुनी-42, अर्जुनी मोरगाव-03 व इतर- 09 रुग्ण आढळून आले.कुवंरतिलकसिंह जिल्हा सामान्य रुगणालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जो करोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल होतो,त्याच्यावर योग्य उपचार केले जात नसून रुग्णालयात रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध असतानाही त्यांना न देता ते इंजेक्शन खासगी रुग्णालयाला विक्री केले जात असल्याचा आरोप होऊ लागलेला आहे.शासकीय रुग्णालयातून बाहेर रुग्णालयात गेलेल्या तीन ते चार रुग्णांनी आपण 3-4 दिवस शासकीय रुग्णालयात दाखल होतो परंतु कुणीच डाँक्टर व्यवस्थित तपासायला येत नाही.सोबतच रेमडेसिव्हरचे इंजेक्शनही देत नाही.अशा काही रुग्णांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.त्यामुळे शासकीय रुग्णालयातील औषधांचा काळाबाजारच होऊ लागल्याने कुणाचाही आता विश्वास यांच्यावर राहिलेला नाही.विशेष म्हणजे प्लाझ्माची गोंदियात गरज असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातांनी ती मशीन अद्यापही सुरु केलेली नाही,त्यामुळे ज्यांना प्लाझ्मा लागतो ते नागपूरवरुन खरेदी करुन आणत असल्याने यामाध्यमातूनही शासकीय रुग्णालयाचे प्रशासनाचे गोंदियातील प्लाझ्मा मशीन सुरु न करण्यामागचे धोरण स्पष्ट होऊ लागले आहे.विशेष म्हणजे आमदार विनोद अग्रवाल यांच्या आढावा बैठकीत अधिष्ठाता डाॅ.नरेश तिडके यांनी स्वतःप्लाझ्मा मशीन सुरु करण्याची गरज नसल्याचे सांगितल्याने डाँ.तिरपूडे यांची आस्था शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्था दुरुस्त करण्याकरीता कशी असेल हे दिसून येत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.