वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं, नागपुरमधील धक्कादायक घटना

Share This News

नागपुरच्या सक्करदरा चौकातील सिनेस्टाईल थरार सीसीटीव्हीत कैद…

कारवाईपासून वाचण्यासाठी वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना नागपुरमध्ये घडली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ट्रॅफिक पोलीस वाहन चालकांची तपासणी करत असताना हा प्रकार घडल्याचं समजतंय.

आकाश चव्हाण असं आरोपीचं नाव असून तो यवतमाळ जिल्ह्यातील केळापूरचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. नागपुरच्या सक्करदरा चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे. वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कारचालकाला चौकात तैनात असलेल्या एका वाहतूक पोलिसाने रोखण्याचा प्रयत्न केला. कारचालक गाडी थांबवत नसल्याचं लक्षात येताच पोलीस हवालदार थेट कारसमोर उभे राहिले. पण तरीही चालकाने कार न थांबविता वाहतूक पोलिसालाच काही मीटर अंतरापर्यंत बोनेटवरून फरफटत नेले. यावेळी त्याने आपल्या कारने अन्य काही गाड्यांनाही धडक मारली. पोलिसाने प्रसंगावधान राखत बोनेटवरून उडी घेतल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावल्याची माहिती आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.