नागपुरात एटीएम तपासणार रेल्वे तिकीट
नागपूर : करोनाच्या साथीमुळे देशभरातील कार्यालये आणि आर्थिक व्यवहार ‘पेपरलेस’ होत आहेत. कोणताही मानवी स्पर्श न होता माहितीचे, चलनाचे आदान-प्रदान करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेने नागपूरसह राज्यातील अनेक रेल्वे स्थानकांवर हायटेक पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
स्वयंचलित तिकीट तपासणी, व्यवस्थापकीय प्रवेश प्रणाली (एटीएमए सिस्टम),
एझिस्पीट स्पिटून, वेंडिंग कियॉक्स आणि बॅगेज रॅपिंग आणि सॅनिटायझेशन सुविधा आदींचा यात समावेश आहे. देशभर पसरलेला साथीमुळे नागपूरसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पुणे स्टेशनवर अतिनील किरणांद्वारे प्रवाशांच्या साहित्याचे सॅनेटायझेशन सुरू करण्यात ओल आहे. नागपूर, मुंबई, आणि पुणे विभागातील विविध स्थानकांवर स्थापित स्वयंचलित वेंडिंग कियॉस्कने मुखपट्टी, फेस शिल्ड, हातमोजे, सॅनिटायझरच्या बाटल्या आदी संरक्षणात्मक साधनांची उपलब्धता करून देण्यात येत आहे. नागपूर स्थानकावर बेडरोल वेंडिंग कियॉस्क प्रवाशांना डिस्पोजेबल बेडरोल प्रदान करीत आहे. नागपूर स्थानकात स्थापित स्वयंचलित तिकीट तपासणी व व्यवस्थापकीय प्रवेश स्वयंचलित पद्धतीने प्रवाशांचे रेल्वे तिकीट तपासत आहे. एझिस्पीट स्पिटून नागपूर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक थुंकण्यापासून होणारी अडचण सोडवित आहे. यासाठी येथे स्पिटून कंटेनर वेंडिंग मशीन लावण्यात आली आहे. त्यातून स्पिट कंटेनर, स्पिट पाउच आणि व्होमिट किट उपलब्ध