चौकशी निःपक्षणे व्हावी म्हणून परमबीर सिंहांची बदली, दोषींवर कडक कारवाई होणार – गृहमंत्री Transfer of Parambir Singh to make the inquiry impartial, strict action will be taken against the culprits – Home Minister

Share This News

मनसुख हिरेन यांच्या प्रकरणात एनआयए आणि एटीएस सखोल चौकशी करत आहेत. एनआयए, एटीएसच्या तपासात कोणतीही बाधा येऊ नये यासाठी परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केली आहे. त्यांना गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. तपास यंत्रणांच्या चौकशीत नीट व्हावी काही अधिकाऱ्यांकडून चुका झाल्या आहेत. तसेच तपासात जे कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर राज्य शासन कडक कारवाई करेल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात साडे बारा हजार भरतीचा निर्णय घेतला होता. परंतु कोरोनामुळे त्यामध्ये उशीर झाला आहे. परंतु पहिल्या टप्प्यात ५३०० पदांवर पोलीस भरती झाली आहे.

महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती खालावली असताना राज्य शासनाने १२५०० पदांची पोलीस भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ५३०० पदांवर पोलीस भरती झाली आहे. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हेमंत नगराळे यांच्याकडे प्रभारी महासंचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. वाझे प्रकरणातील चौकशीत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी राज्य सरकारने आयपीएसच्या गोटात मोठ्या बदल्या केल्या आहेत.

वाझे प्रकरणात परमबीर सिंहांची चौकशी व्हावी – सोमय्या

सचिन वाझे प्रकरणात दोन मंत्री खुप धडपड करत होते. त्यांचाही तपास व्हावा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. तर एनआयए सचिन वाझे प्रकरणात एका आयपीएस अधिकाऱ्याची चौकशी करणार आहेत. परंतु यामध्ये परमबीर सिंह यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. सचिन वाझे हे परमबीर सिंह यांच्या नेतृत्वात काम करत होते. त्यामुळे सचिन वाझे यांनी केलेल्या कृत्यामध्ये परमबीर सिंह याचाही सहभाग आहे असे आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.