महामेट्रोकडे शहर बस संचालनाच्या हस्तांतरणाला परिवहन समितीची मंजुरी |Transport Committee approval for transfer of city bus operation to Mahametro

Share This News

नागपूर :  नागपूर शहर बस सेवा संचालन महामेट्रोकडे हस्तांतरीत करण्याच्या प्रस्तावाला परिवहन समितीने मंजुरी प्रदान केली आहे. अटी व शर्तीसह महामेट्रोला परिवहन सेवा हस्तांतरित करण्याबाबत धोरण निश्चित करून त्यास बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली. संपूर्ण विषयाच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महासभेपुढे विषय सादर करण्याचे एकमताने परिवहन समितीद्वारे निर्णय घेण्यात आला.

मनपाच्या शहर बस सेवेमध्ये २३७ स्टँडर्ड डिझेल बसेस, ६ महिलांसाठी विशेष ‘तेजस्विनी’ बसेस, १५० मिडी बसेस व ४५ मिनी बसेस अशा एकूण ४३८ बसेस आहेत. या सर्व बस महामेट्रोकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. या सर्व बसेसचे योग्य संचालन करून शहरातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने त्या सुरळीत सुरू राहाव्यात याबाबत परिवहन समिती सभापती नरेंद्र बोरकर यांनी सूचना केली. 

सर्व बसेस हस्तांतरीत करताना त्यासोबत संपूर्ण यंत्रणाही हस्तांतरीत केली जात आहे. यामध्ये मनपाचे परिवहन विभागाचे सर्व कर्मचारी व संगणक ऑपरेटर्सचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. शहर बसचे व्यवस्थित संचालन व्हावे याकरिता महामेट्रोकडे मनपाचे निवडक पदाधिकारी विश्वस्त म्हणून कार्यभार पाहतील, अशी सूचनाही यावेळी सदस्यांद्वारे मांडण्यात आली.

हिंदुस्थान समाचार 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.