19.99 लाखांच्या रोख रकमेची रेल्वेने अवैध वाहतूक

Share This News

गोंदिया आरपीएफची कारवाई

गोंदिया,दि.01 : एक व्यक्ती 19 लाख 99 हजार 400 रुपये अवैधरित्या गोंदिया स्थानकावरून ट्रेन क्रमांक 02843 ने नागपूरला घेऊन जात होता. संशय आल्याने रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. ही घटना  बुधवार, 31 मार्चच्या दुपारी 12.40 वाजताच्या सुमारास घडली.

रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानक परिसरात ज्वलनशील पदार्थ व धूम्रपान प्रतिबंधासाठी मंडल सुरक्षा आयुक्त पंकज चुघ व सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनात रेल्वे सुरक्षा दलाद्वारे अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान सुरू असताना कर्तव्यावर तैनात असलेल्या मुख्य आरक्षक राजेंद्र रायकवार यांच्याकडून माहिती मिळाली की, एका व्यक्तिला संशयाच्या आधारावर सामानासह थांबविण्यात आले आहे. जेव्हा त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने आपले नाव राकेश असल्याचे व गोंदियातील रहिवासी असल्याचे सांगितले. त्याच्या जवळ असलेल्या सामानाबाबत चौकशी केल्यावर तो उत्तर देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे त्याची झळती करण्यात आली. त्यात त्याच्याजवळ 19 लाख 99 हजार 400 रुपये रोख प्राप्त झाले.त्यावेळी सदर रकमेबाबत वैध प्रमाणपत्र व लेखा-जोखा विवरण सादर करण्यास सांगण्यात आले. मात्र त्याने त्याबाबत असमर्थता व्यक्त केली. तो सदर रकमेबाबत कोणत्याही प्रकारचे दस्तावेज सादर करू शकला नाही. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने त्याचे बयाण घेऊन रुपयांच्या तस्करीचे प्रकरण नोंदविले. तसेच सदर प्रकरण कायदेशीर कारवाईसाठी गोंदिया आयकर विभागाकडे सोपविले. सदर कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक नंदबहादूर व त्यांच्या सहकार्‍यांनी केली


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.