थरारक..बापानेच कापला दोन वर्षीय मुलीचा गळा

Share This News

नागपूर : कुटुंबरात होणाऱ्या वादामुळे संतापलेल्या एका बापाने ब्लेडने गळा चिरून दोन वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर त्याच ब्लेडने स्वत:च्याही गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना बुटीबोरीतील गणेशपूर परिसरात घडली. राधिका किशोर सोयाम हे मरण पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. किशोर सुखदेव सोयाम (वय २६, मूळ रा. सिंदेवाही) यांनी हे कृत्य केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी किशोरने पूजासोबत (वय २३) प्रेमविवाह केला. त्यानंतर तो गणेशपूर येथे राहायला आला. त्यांना राधिका ही मुलगी झाली. गेल्या काही दिवसांपासून किशोर पूजाच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. तो पूजाला मारहाणही करायचा. घटनेच्या दिवशी किशोरने मद्यप्राशन केले. नशेत त्याने पूजाला मारहाण केली. याबाबत तक्रार देण्यासाठी पूजा बुटीबोरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गेली. याचदरम्यान किशोरने पूजाच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘पोलिसांत तक्रार दिली तर ‘तुला व मुलीला ठार मारेन’, अशी धमकी दिली. त्यानंतर किशोरने ब्लेडने राधिकाचा गळा चिरला. तिचा मृत्यू झाल्यानंतर किशोर याने स्वत:च्याही गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तेवढ्यात पूजा पोलिसांसह घरी परतली. त्यावेळी राधिका व किशोर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी राधिकाला तपासून मृत घोषित केले. बुटीबोरी पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.