दिल्लीत स्फोटानंतर राज्यात सतर्कतेचा इशारा

Share This News

मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश –  दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले आहेत. “दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांशी चर्चा करून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले,” असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे. तसेच “राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे,” असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राजधानी दिल्लीतीलइस्रायली दूतावासाजवळ शुक्रवारी झालेल्या स्फोटाशी संबंधित एक लिफाफा सापडला आहे. यातून स्फोटाचे इराण कनेक्शन समोर आले आहे. या लिफाफ्यात हा स्फोट म्हणजे ट्रेलर असल्याचे सांगण्यात आले असून बदल्याची भाषा करण्यात आली आहे. एवढेच नाही तर, यात 2020 मध्ये मारल्या गेलेल्या कासिम सुलेमानी आणि इराणचे वरिष्ठ न्यूक्लियर सायंटिस्ट मोहसिन फखरीजादेह यांचाही उल्लेख आहे. लिफाफ्यातून समोर आलेल्या माहितीनंतर, या घटनेमागे इराण कनेक्शन असल्याची शंका बळावली आहे. यापूर्वी 2012 मध्ये इस्रायलच्या एका कारमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटातही इराणचेच दोन लोक सहभागी होते. या घटनेनंतर ते फरार झाले होते. विशेष म्हणजे हे लोक दिल्ली येथील पहाडगंज हॉटेलमध्ये थांबले होते. गुप्तचर संस्थां अद्यापही त्यांच्या


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.